माभळे आणि संगमेश्वर परिसरातील महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते अद्याप अपूर्णच


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे सुरू असतानाच माभळे आणि संगमेश्वर परिसरातील महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते अद्याप अपूर्णच आहेत. रस्त्यांची अर्धवट कामे, अपूर्ण गटारे आणि अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनांमुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या वेळी या मार्गांवरून प्रवास करणे धोकादायक बनले असून एखाद्या मोठ्या अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि बांधकाम सुरू आहे. मात्र, महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट सोडण्यात आली आहेत, तर गटारांचे बांधकामही मध्येच थांबवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचणे, चिखल निर्माण होणे आणि वाहनांना मार्ग काढताना अडचणी येणे असे प्रकार घडत आहेत. अर्धवट कामांच्या ठिकाणी आवश्यक सूचनाफलक, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक चिन्हांचा अभाव असल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button