
गुहागर समुद्रकिनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ चा दर्जा; भाजपाचे गणेश कदम यांनी पर्यटकांना पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा
गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या समुद्र किनाऱ्याला डेन्मार्कस्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षा आणि शाश्वत पर्यटन या निकषाच्या आधारे ‘ब्लू फ्लॅग’ हा बहुमूल्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल गुहागरचे सुपुत्र व भाजपाचे कल्याण जिल्हा सचिव गणेश कदम यांनी गुहागरच्या प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिरात अभिषेक केला.
तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांची भेट घेतली व मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
जागतिक ओळखीमुळे गुहागरच्या पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. समुद्रकिनाऱ्यांसाठी ब्लू फ्लॅग सीझन सुरू होईल व लवकरच अधिकृत ध्वज नेदरलँडमधून आणून ध्वजारोहण समारंभ आयोजित केला जाईल. तत्पूर्वी गणेश कदम यांनी पर्यटकांना पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.



