‘जेवढा निधी उपलब्ध, तेवढीच रस्त्यालगतच्या झाडीची कटिंग!’

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप;

राजापूर : राजापूर शहरातून राजापूररोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाढलेली धोकादायक झाडी, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून जेवढा निधी उपलब्ध झाला, तेवढ्याच प्रमाणात झाडी कटिंग करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद कांबळे यांनी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निधीअभावी धोकादायक झाडी तशीच ठेवायची का, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मंगळवारी आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी राजापूररोड रेल्वे स्थानक परिसराचा दौरा करून या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्याची नियोजित वेळ सायंकाळी ५.३० वाजताची असतानाही आमदार सामंत त्यापूर्वीच परिसरात दाखल झाले आणि सायंकाळी ५ वाजताच पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button