रत्नागिरीत युवतींसाठी ‘मै हूं दुर्गा’ शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू युवतींसाठी ‘मै हूं दुर्गा!’ या विशेष अभियानांतर्गत विनामूल्य शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत सात दिवस चालणार आहे.

हे शिबिर रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील मारुती मंदिर परिसरात दररोज सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत होणार असून, यात शिबिरामध्ये सहभागी युवतींना लाठी-काठी, दंडसाखळी आणि कराटे यांसारख्या शौर्य प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
या विनामूल्य शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवतींनी नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी येथे क्लिक करा
https://forms.gle/aLZhSBRBpyJ3Mqow7

अधिक माहितीसाठी संपर्क : ९५२७१९४६११

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button