जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी तर्फेजायंट्स सेवा सप्ताह संपन्न.

दरवर्षीप्रमाणे, सप्टेंबर महिन्यात दि. २० ते दि. २७ दरम्यान जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी तर्फे जायंट्स सेवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कोळंबे, रत्नागिरी येथील श्री स्वामी समर्थ ध्यानमंदिर, येथे साधारण वैद्यकीय तपासणी शिबिर, दंतचिकित्सा शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोळंबे ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यासाठी रत्नागिरी येथील डॉ. ओंकार पटवर्धन, डॉ. संजय पाटील, डॉ. प्राजक्ता वाघधरे तसेच नाचणे येथील पुराणिक ऑप्टिशियन्स चे संजय पुराणिक यांचे तसेच श्री स्वामी समर्थ ध्यानमंदिर संस्थेचे हिराकांत साळवी आणि कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सप्ताहापैकी एका उपक्रमाअंतर्गत मौजे कोंडये, पाली येथील भाकर संस्थेतील वृद्धांसाठी, नित्य उपयोगी स्वच्छता साहित्य विनय मेडिकल, रत्नागिरी, चे विनायक जोशी यांच्या सहकार्याने पुरविण्यात आले.
तेथील वृद्धांकरिता डॉ. प्रसन्न मुळये यांचे वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सेवा सप्ताहाच्या काळात शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी अशा दोन गटांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाकरिता उपयोगी पुस्तके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमासाठी भरत इदाते सर, सत्यशोधक प्रिंटिंग प्रेस चे नितीन लिमये यांचे विशेष योगदान लाभले.

दापोली येथील श्रीराम सांस्कृतिक संस्थेच्या वाचनालयासाठी विविध विषयांवरची पुस्तके भेट देण्यात आली. त्यासाठी जायंट्स ग्रुपचे संतोष कदम, देवेंद्र जोशी आणि भरत इदाते यांनी आर्थिक मदत केली.

सेवा सप्ताहाची सांगता, रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये आयोजित रक्तदान शिबिराने करण्यात आली.

जायंट्स सेवा सप्ताह निमित्त आयोजित या सर्व उपक्रमांसाठी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी चे अध्यक्ष महेश दामले यांनी नियोजन केले होते. त्यांना उपाध्यक्ष योगेश पटवर्धन, माजी अध्यक्ष श्रीकांत भिडे, भूषण मुळ्ये, सभासद विजय पोकळे आणि मार्गदर्शक डॉ. मिलिंद सावंत, संजय पाटणकर यांनी आपले सहकार्य देऊन सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button