NCMC कार्डसाठी रत्नागिरी एसटी स्थानकात गोंधळ सुरूच तांत्रिक अडचणी मुळे कार्डचे काम ठप्प ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठी गर्दी


रत्नागिरी 🙁 आनंद पेडणेकर)
एसटीने सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मिळविण्यासाठी रत्नागिरी एसटी स्थानक परिसरात अजूनही गोंधळ सुरू आहेच आज सकाळी देखील ही स्थिती कायम होती हे कार्ड मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची मोठी गर्दी केली होती होती. ठराविक वेळेतच हे कार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याने नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एसटी प्रवासात विविध सवलतीच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता एनसीएमसी कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. कार्ड नसल्यास प्रवाशांना पूर्ण तिकीट दराने प्रवास करावा लागू शकतो, तर कार्ड उपलब्ध असल्यास संबंधित सवलतीच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी काल नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अनेकांना निराश होऊन परतावे लागले होते त्यामुळे आज सकाळीच अनेक नागरिक कार्ड साठी आली होती मात्र हे कार्ड देण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाली आहे त्यामुळे ही कार्ड तयार होऊन मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या असंतोष निर्माण झाला आहे कार्ड सक्तीचे केल्यामुळे अनेकांना भरलं भरून जास्त दराने तिकिटे घेऊन प्रवास करावा लागत आहे याबाबत नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून काही उत्तर दिले जात नाही त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नागरिकांना सवलत देण्यात यावी तसेच हा तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात यावा याबाबत प्रशासनाने व लोकप्रतिनिधी देणे तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button