
राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतले चार मोठे निर्णय, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह मिळणार हे लाभ
मराठाआरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मराठा समाजासाठी चार मोठे निर्णय घेतले आहेत.
तसेच या निर्णयाचे शासन आदेशही काढण्यात आले आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या या चार निर्णयांनुसार पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. त्याबरोबरच पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता वसतीगृहाचा लाभ घेता येणार आहे. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.त्याबरोबरच कुणबी प्रमाणपत्राबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली असून, शिंदे समितीला सापडलेल्या कुणबी नोंदी ग्रामपंचायतींमध्ये लावण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.




