ठाकरे गटाच्या राऊत यांची नगरसेवक पद रद्द करण्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली


महानगरपालिकेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या राऊत यांची नगरसेवक पद रद्द करण्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.पालघरच्या जात पडताळणी समितीने विशाखा राऊथ यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले होते. या निर्णयाविरूद्ध विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथं देखील त्यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर मुंबई महानगर पालिकेने राज्य सरकारला पत्र लिहित नगरसेवक पद रद्द झाल्याच जाहीर करायला सांगितलं होत. मात्र पालिकेच्या या पत्रव्यवहातला विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button