
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. पाटील यांचा राजीनामा
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर्सची टंचाई असताना जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. रोहित पाटील अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. पाटील हे बालरोग तज्ज्ञ म्हणून उत्तम प्रकारे काम करत होते. असे असताना त्यांनी अचानक पदत्याग केल्याने जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या वैद्यकीय महाविद्यालया कडून काही प्राध्यापक डॉक्टर नियुक्त आहेत. डॉ पाटील हे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियुक्त होते असे सांगण्यात आले.




