
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, दि. ९ ) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार वसतिगृह योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत सन २०२६-२७ या वर्षाकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजना राबविण्यात येतात. इयत्ता १२ वी नंतरच्या बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या तसेच पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा लाभ घेता येईल.
विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची छापील प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी या कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी.




