
गुहागर तालुक्यातील वेळंबमध्ये बंद घरातून १. ७५ लाखांची चोरी
ऐन गणेशोत्सवामध्ये गुहागर तालुक्यातील वेळंब येथे बंद घरातील पर्समध्ये ठेवलेल्या १ लाख ७१ हजार ४२ रुपयाचा ऐवज चोरी केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे प्राथमिक स्थितीत घराच्या दरवाजाची कडी-कोंयडा न काढता घरात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये वेळंब येथील पुनम गुरव यांनी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. त्या सध्या मुंबई येथे राहात असून, त्यांच्या वेळंब गुरववाडी येथील घरात हा प्रकार घडला. चोरट्याने घरात प्रवेश करताना दरवाजा, कडी-कोयंडा किंवा खिडकीची कोणतीही तोडफोड केल्याचे आढळून आलेले नाही. घरातील पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र, साखळ्या, अंगठ्या, झुमके, नथ तसेच चांदीचे दागिने आणि ४ हजार ३०० रुपयांची रोकड चोरीस गेली आहे.




