खासगी वाहतूकदारांवर नियंत्रण ठेवा, चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड अशी शटल बस सेवा सुरू करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने खाजगी वाहतूक करणारे वाढीव दर लावून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी येत असतात. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत रत्नागिरीचे अध्यक्ष संजय वैशंपायन आणि सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि विभाग नियंत्रक एसटी महामंडळ यांची भेट घेऊन प्रवासी ग्राहकांसाठी प्रवासाची सुविधा रास्त दराने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
एसटी महामंडळ विभाग नियंत्रक विश्वजीत जानराव यांच्यासोबत या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा करण्यात आली असून रेल्वे स्थानकावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले आहे. या शिवाय प्रवाशांना रात्री अपरात्री रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर होणाऱ्या प्रवासाच्या अनुपलब्धतेच्या दृष्टीने गणेशोत्सव कालावधीमध्ये सतत शटल बस सेवा सुरू करण्यासाठी बसेस, मनुष्यबळ यांच्या उपलब्धतेचा विचार करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड अशी २४ तास सिटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक जानराव यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button