
मालाडमध्ये खांब कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील चिकुवाडी येथे स्थानिक मुलांनी दहीहंडीचा उत्सव आयोजित केला होता. यावेळी हंडी फोडण्यासाठी दोर एका झाडाला आणि इमारतीच्या तळमजल्यावरील खांबाला बांधण्यात आला होता. हंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा खांब अचानक कोसळला. यावेळी सात वर्षीय रुद्र कदम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



