
दापोली तालुक्यातील बुरोंडी येथून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता
दापोली तालुक्यातील बुरोंडी येथून १४ वर्षे ४ महिन्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईक यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुरोंडी येथील ही मुलगी नेहमीप्रमाणे क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी पोलिसांत बाब घेत तक्रार दाखल केली. दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल साक्षी गुजर करीत आहेत.




