
सहकारी संस्थांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी दर महिन्याला होणार हाऊसिंग दरबार
रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे विविध प्रश्न तातडीने व प्रभावीपणे सोडवण्यासाठी रत्नागिरी आणि चिपळूण येथे दर महिन्याला ’हाऊसिंग दरबार’ भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राम कुलकर्णी यांनी दिली. गृहनिर्माण संस्थांच्या अडीअडचणींची दखल घेऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असेही त्यांनी नमूद केल.
सहकारी संस्थांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना कुलकर्णी यांनी जिल्ह्यात एकूण २ हजार ३५८ गृहनिर्माण संस्था (ज्यात ६७० ग्रामीण आणि १ हजार ६८१ शहरी भागातील संस्थांचा समावेश आहे.) कार्यरत असल्याची माहिती दिली. तसेच, जिल्ह्यात १०९ ग्रामीण, ७५ शहरी आणि ७४ कर्मचारी पतसंस्था अशा एकूण २५८ पतसंस्था असून ३४८ विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांच्या समस्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल.




