
रत्नागिरीत स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथीनिमित्त प्रवचन
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या वतीने 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.45 ते 7.45 या वेळेत अध्यात्म मंदिर वरची आळी, रत्नागिरी येथे सौ. निलीमा लिमये यांचे ‘अंतरी असावा अखंड उल्हास’ प्रवचन व श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सौ. निलीमा लिमये या पुणे येथील असून त्या बी.कॉम असून फायनान्स याविषयात एमबीए केले आहे. गेली 25 वर्षे आयटी क्षेत्रात फायनान्स डिपार्टमेंटमध्ये त्या नोकरी करीत आहेत तसेच त्यांना प. पू. डॉ श्रीकृष्ण देशमुख, मुरगूड यांचा अनुग्रह मिळाला आहे आणि तेव्हापासुन दासबोध, भगवदगीता या ग्रंथाचा अभ्यास सुरु आहे. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त व सह सचिव आहेत. तसेच शिवथरघळ येथे युवा तसेच प्रापंचीक शिबिरात सत्र घेतात.
तरी या प्रवचन व श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन सोहळ्याला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी केले आहे.




