रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत समावेश


रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पोलीस अधीक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन


रत्नागिरी : ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या ताज्या मानाच्या यादीत महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचाही समावेश झाल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, सक्षम नेतृत्व, नागरिकाभिमुख पोलीसिंग आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे, अशा विविध निकषांच्या आधारे या यादीसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यावर भर दिला जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करताना जनतेशी संवाद वाढवून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई, नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते.

‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत नितीन दत्तात्रय बगाटे यांचा समावेश होणे ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात असून, यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

या सन्मानाबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button