भुईबावडा घाटात दरड कोसळली; ठप्प झालेली वाहतूक एकेरी मार्गाने पुन्हा सुरू


वैभववाडी-कोल्हापूरला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. काल रात्री घाटात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोठेमोठे दगड कोसळून हा घाटमार्ग पूर्णतः बंद झाला आहे.
त्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरला जाणारी वाहतूक उंबर्डे-वैभववाडी-करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला हटविल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.तूर्तास दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेले दगड आणि माती बाजूला करण्यात आली आहे. तूर्तास या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button