कोदवली येथील इमेन्स पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

राजापूर, दि. २१ जून : राजापूर तालुक्यातील कोदवली येथील इमेन्स पब्लिक स्कूलमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक श्री. नाचरे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षकांनीही योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.

शाळेचे सेक्रेटरी श्री. मज्जिद पन्हळेकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी नियमित योग करून निरोगी व सुदृढ जीवन जगावे, असा संदेश दिला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रृती रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.

“योग हा निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवनाचा पाया आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button