असा मी काय गुन्हा केला, माझे कळे ना मला.-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे


शिवसेना नेत्यांकडून होणाऱ्या सततच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे पहिल्यांच आपले मत व्यक्त केले आहे. असा मी काय गुन्हा केला माझेच कळे ना मला असे म्हणत त्यांनी शिवसेना नेत्यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.माझ्या राजकीय वाटचालीत मी कधीही कोणावर पातळी सोडून टीका केली नाही आणि यापुढेही करणार नाही. माझी बांधिलकी जनतेशी आहे आणि मी त्यांच्या प्रश्नांसाठी काम करत राहीन. माझ्यावर टीका करून कोणाला आनंद होत असेल तर करू द्या असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांकडून तटकरे यांना लक्ष केले जात आहे. तटकरे कुटूंबाला कोंडीत पकडण्याची रणनिती शिवसेनेनी आखली असल्याचे पहायला मिळत आहे. आधी महेंद्र थोरवे, नंतर रामदास कदम आणि आता आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत टिका केली या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे पहिल्यांच व्यक्त झाले. अलिबाग येथे पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी या टीकेला असा मी काय गुन्हा केला माझेच कळेना मला या काव्यात्मक पंक्ती म्हणून उत्तर दिले.मी शांतपणे माझे काम करत राहणार, गेल्या पंधरा वर्षात मी तीन लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या पध्दतीने लढलो. या तिनही निवडणुकीत मला अलिबाग विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान जे आज आहे ते उद्याही राहील, राजकारणात चढ उतार येतात, पण हा चढ आहे की उतार हे येणाऱ्या काळत स्पष्ट होईल. काम करणाऱ्या माणसासाठी मार्ग तयार होत जातात. पाठबळ मिळत राहते, त्यामुळे आपले काम करत राहणार. महाराष्ट्रातील जनतेला आणि रायगड मधील लोकांना सुनील तटकरे काय चीज आहे हे माहीत आहे. राजकारणात अनेक आव्हाने येत असतात. माझ्या जीवनात ती अनेकदा आली. पण नियत साफ असेल, सदसदविवेक बुध्दी जागृत असेल तर या आव्हानामधून बाहेर पडता येते असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button