विजेच्या धक्क्याने ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, आडे कोळीवाडा परिसरावर शोककळा;
*दापोली
आषाढी कार्तिकी उत्सवासाठी वाडीतील सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करताना एका महिलेचा विजेच्या धक्क्याने झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण दापोली तालुक्याला हादरवून गेला आहे. आडे कोळीवाडा येथील झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहाची साफसफाई सुरू असताना झालेल्या या अपघातात पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे आडे कोळीवाडा परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक ठिकाणांच्या विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पुष्पा नांदगावकर या वाडीतील महिला मंडळाबरोबर आषाढी कार्तिकी उत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून वाडीतील सभागृहाची साफसफाई करत होत्या. काम सुरू असताना गॅलरीमध्ये त्यांचा पाय घसरून तोल गेला. त्याचवेळी सभागृहाच्या बाजूने गेलेल्या विजेच्या मुख्य तारेला त्यांचा हात लागल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला.
घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना आंजर्ले येथील डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबीयांवर आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विजेच्या धक्क्याने ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, आडे कोळीवाडा परिसरावर शोककळा;
दापोली-आषाढी कार्तिकी उत्सवासाठी वाडीतील सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करताना एका महिलेचा विजेच्या धक्क्याने झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण दापोली तालुक्याला हादरवून गेला आहे. आडे कोळीवाडा येथील झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहाची साफसफाई सुरू असताना झालेल्या या अपघातात पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे आडे कोळीवाडा परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक ठिकाणांच्या विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.