
रुग्णांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी! महाराष्ट्रात आज होणारा डॉक्टरांचा संप अखेर स्थगित
महाराष्ट्रातील लाखो रुग्णांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये आहेत आज होणारा डॉक्टरांचा प्रस्तावित संप अखेर स्थगित करण्यात आला आहे.सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आणि मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टर संघटनांनी हा निर्णय जाहीर केला.
या निर्णयामुळे उद्यापासून रुग्णसेवा सुरळीत सुरू राहणार असून ओपीडी, आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवा पूर्ववत उपलब्ध राहतील. संपाची शक्यता लक्षात घेऊन चिंतेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.




