
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गवत मारण्याचे विष प्राशन् केल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गवत मारण्याचे विषारी द्रव प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सुयोग विष्णू मोहिते (३५, रा. करबुडे, मोहितेवाडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. सुयोग याला दारुचे व्यसन होते. सुयोग याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गोठ्यातील गवत मारण्याचे विषारी द्रव प्राशन केले. यावेळी त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ जुलै रोजी सुयोग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.




