
महायुतीतील समन्वयाचे दर्शन भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
महायुतीतील घटक पक्षांमधील सुसंवाद समन्वय आणि परस्पर स्नेहाचे दर्शन घडविणारा प्रसंग नुकताच रत्नागिरीत पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांनी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे तसेच बाबू सुर्वे हे देखील उपस्थित होते. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी बिपीन बंदरकर यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सदिच्छा भेटीत महायुतीतील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील परस्पर विश्वास संवाद आणि एकजूट अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी काळात महायुतीचे घटक पक्ष विकासकामे आणि जनहिताच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करून जनतेचा विश्वास अधिक बळकट करतील असा संदेश या भेटीतून नागरिकांपर्यंत पोहोचला.
महायुती ही केवळ राजकीय आघाडी नसून विकास समन्वय आणि जनसेवेची मजबूत भागीदारी असल्याचे या सदिच्छा भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.




