बहादूरशेख नाका येथे गर्डर बसविण्याच्या कामाला वेग; खबरदारी म्हणून वाहतुकीत बदल

चिपळूण : मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून, बहादूरशेख नाका येथे पुलाचे गर्डर बसविण्याचे महत्त्वाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अवजड क्रेनच्या सहाय्याने पिलरवर गर्डर बसविण्यात येत असून, काम सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

मुंबई–गोवा महामार्ग आणि गुहागर–विजापूर मार्गावरील महत्त्वाचा जंक्शन असलेल्या बहादूरशेख नाका चौकात दोन वर्षांपूर्वी उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुलाच्या आराखड्यात आवश्यक बदल करून नव्याने काम सुरू करण्यात आले.

सध्या गर्डर बसविण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून, उड्डाण पुलावरील सर्व गर्डर बसवून काँक्रिटीकरणाचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, गर्डर बसविण्याच्या कामामुळे बहादूरशेख नाका चौकातून खेर्डीकडे तसेच बाजारपेठेकडे जाणारी वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती बंद करण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button