फक्त बोला, तक्रार आपोआप तयार होईल; तुकाराम मुंढेंनी काढला सर्वात सोपा मार्ग, FDA चा तगडा प्लॅन


अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.

आता कुठेही जेवण किंवा औषध भेसळयुक्त आढळल्यास एफडीकडे तक्रार करण्यासाठी तुकाराम मुंढेंनी एक सोपा मार्ग तयार केला आहे. सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेले AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो, असं तुकाराम मुंढे म्हणालेकृत्रिम बुद्धिमत्ता तक्रार आपोआप तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाची उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे, असं तुकाराम मुंढे फेसबुक पोस्ट करत म्हणाले. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला…तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button