चिपळूण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोनवर प्रवासी भिजत असल्यामुळे तत्काळ शेड व शौचालयाची व्यवस्था करावी -शौकत मुकादम


चिपळूण हे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तेथील काही रेल्वेच्या गाड्या फलाट क्रमांक दोन वर थांबतात. यामुळे या फलाटावर तातडीने शेड व उभी करावी व शौंचालयही बांधण्यात यावे, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
ते पुढे म्हणाले की, फलाट क्रमांक दोन वर रेल्वे प्रवाशांना ऊन्हाळामध्ये ऊन्हात व पावसाळ्यामध्ये पावसात उभे रहावे लागते. यामुळे रेल्वे गाडी येईपर्यंत फलाट क्रमांक दोन वर थांबविणार्‍या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व त्या ठिकाणी शौंचालयाचीही व्यवस्था नसल्यामुळे फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरी यावर तातडीने निर्णय घेऊन वरील विषय मार्गी लावावे असेही श्री. मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button