गोवा आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सरस्वती डान्स अकॅडमीचा झेंडा; गुरु स्नेहल कळंबटे नागले यांना ‘नृत्य कलाकृती ॲवॉर्ड’


रत्नागिरी : गोवा कला अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट – अखिल नटराजम संघ, भारत नृत्य महोत्सव २०२६ मध्ये सरस्वती डान्स अकॅडमी, कारवांचीवाडी, रत्नागिरीच्या स्पर्धकांनी उल्लेखनीय यश संपादन करत मानाचा तुरा खोवला.

भरतनाट्यम् नृत्यशैलीतील उत्कृष्ट कार्याबद्दल अकॅडमीच्या गुरु सौ. स्नेहल कळंबटे नागले यांना ‘नृत्य कलाकृती ॲवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विधा लाल मॅडम आणि वैष्णवी पाटील मॅडम यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच त्यांना ‘सुपर मॉम – Winner Award’ नेही गौरविण्यात आले.

या स्पर्धेत सरस्वती डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले. त्यामध्ये सौम्या शिवप्रसाद सावंत हिने 1st Runner-up Award, ईशान्वी विक्रम नागले हिने 2nd Runner-up Award, तर विद्मयी जयंत माने, जिगीषा जयंत माने आणि श्रुती मंगेश चव्हाण यांनी President Award प्राप्त केला.

सरस्वती डान्स अकॅडमी, कारवांचीवाडीने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, कलारसिक आणि परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button