गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण ३ जुलैपासून सुरू


यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची लगबग सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धावणार्‍या, रेल्वेगायांचे आरक्षण ३ जुलैपासून खुले होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी असल्याने ११ सप्टेंबरपासूनची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर झुंबड उडणार आहे.
गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण ६० दिवस अगोदर खुले होते. त्यानुसार ३ जुलैपासून आरक्षण खुले होत असल्याने गणेशभक्तांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. १ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण ३ जुलै रोजी खुले होणार आहे. यानंतर तारखनिहाय आरक्षण खुले होणार आहेत.
गणेशचतुर्थीच्या दिवशीचे म्हणजे १४ सप्टेंबरचे आरक्षण १६ जुलै रोजी खुले होईल. रेल्वे प्रशासनाने आरक्षण व प्रवासाच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी गणेशोत्सव कालावधीत नेमक्या किती स्पेशल गाड्या चालवणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button