खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे लोंबकळत असलेली केबल मानेत अडकून तरुण जखमी


खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे लोंबकळत असलेली केबल मानेत अडकून तरूण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या जखमी तरूणास नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरूणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
याठिकाणी तीन केबल वायर अनेक दिवसांपासून रस्त्यावर लोंबकळत आहेत. या बाबत ग्रामस्थांनी सातत्याने सूचना करून देखील त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोघेजण दुचाकीने मोहल्ल्यातून जात असताना रस्त्यावर लटकत असलेल्या केबलमध्ये त्यांची दुचाकी अडकली. एक वायर दुचाकीच्या मागे बसलेल्या तरूणाच्या गळ्यात अडकली.
घटनास्थळापासून दुचाकी काही अंतरावर फरफटत गेल्यानंतर केबल तुटल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर ग्रामस्थानी घटनास्थळी पोहचून जखमी तरूणास उपचारासाठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button