
कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे तीन महत्त्वाचे घाट व घाट मार्ग बंद झाल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न
रायगड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते व घाट मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये पुणे , पंढरपूर महाबळेश्वर ,कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. महाड ,दापोली ,खेड, पोलादपूर ,श्रीवर्धन ,म्हसळा व माणगाव येथील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
महाबळेश्वर कोल्हापूर व साताऱ्याकडे जाणारा प्रमुख आंबेनळी घाट दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे बंद झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी सात जुलै पासून 31 जुलै पर्यंत हा घाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता येथील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.तर पुणे व पंढरपूर कडे जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या वरंध घाटामध्ये दरड कोसळल्याने हा मार्गही बंद झाला आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या घाटातील वाहतूक बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर ताम्हिणी घाट घाट मार्गे पुणे येथे जाण्यासाठी वापरात असलेला रस्ता घाटामध्ये खचल्याने माणगाव ते पौड या मार्गावरील वाहतूक पुढील आदेश मिळेपर्यंत पर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
हे तीनही घाट एकाच वेळी बंद झाले आहे. हे गाठ एकमेकाला आपत्कालीन स्थितीत पर्यायी घाट म्हणून वापरात येत होते .परंतु आता तीनही घाट बंद झाल्याने घाटांची दुरुस्ती व दरड काढण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून याकरता कालावधी लागणार असल्याने प्रवाशांची ससेहोलपट होणार आहे.या भागामध्ये नागरिक आधुनिक वैद्यकीय सेवा उच्च शिक्षणासाठी पुणे येथे मोठ्या प्रमाणात आहेत. बंद मार्गांचा परिणाम विद्यार्थी व रुग्णांनाही सहन करावा लागणार आहे .या भागातील प्रवाशांनाआता पाली खोपोली मार्गे पुणे तर चिपळूण कराड मार्गे सातारा ,कोल्हापूर गाठावे लागणार आहे. यामुळे प्रवासाचे अंतर तर वाढणार आहे व आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.




