कृषी दिनानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे दिनांक १ जुलै रोजी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन, हरित परिसराची निर्मिती आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रम मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन यांच्यामार्फत देण्यात आलेल्या बांबू, गुलबक्षी, रेन ट्री, बहावा अशा बी-गोळ्यांची तसेच रोपांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button