कहते थे इस सरकार में इस्तीफे नही होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच जंतरमंतरवर फटाके फुटले; प्रचंड जल्लोष


शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जंतर मंतर येथे बोलताना ते म्हणाले की, आपण सर्वांनी हे करुन दाखवलं.हे लोक काय म्हणायचे की इस सरकार में इस्तिफे नही होते. क्या कहते थे इस सरकार में इस्तिफे नही होते

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, या संपूर्ण चळवळीची सुरुवात करणारे अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. “सुबह हो गई मामू… लोकशाहीची सकाळ झाली आहे. देशाची जनता जागी झाली आहे. मी आधीच सांगितलं होतं, ही पहिली विकेट आहे. इथेच थांबणार नाही, ही तर फक्त सुरुवात आहे,” असे अभिजित दिपके म्हणाले.पुढे बोलताना त्यांनी, “मला हिरो बनवू नका. ही चूक पुन्हा करू नका. एका व्यक्तीला हिरो बनवल्यामुळे आणि त्याला संविधानापेक्षाही मोठं मानल्यामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. मी मोडेन, पण वाकणार नाही. चुकीच्या माणसाशी पंगा घ्यायचा नाही,” असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. “या सरकारमध्ये कोणीही राजीनामा देत नाही, असं सरकारच म्हणत होतं. पण आम्ही राजीनामा घेऊन दाखवला,” असा दावा अभिजित दिपके यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button