आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना, अक्कलकोट येथे ‘श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान’ येथे जाऊन भावपूर्ण दर्शन घेतले.

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना, अक्कलकोट येथे ‘श्री d d महाराज देवस्थान’ येथे जाऊन परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन भावपूर्ण दर्शन घेतले.

याप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी अक्कलकोट येथील लाखो भक्तांची माऊलीच्या मायेने सेवा करणाऱ्या प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला सदिच्छा भेट दिली. अन्नछत्राचे अध्यक्ष श्री. जन्मजयराजे भोसले यांच्याकडून येथील अन्नदान उपक्रम, व्यवस्थापन आणि सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाचा यशस्वी शुभारंभ केला. ‘जनसेवा’ करण्यासाठी स्वामींचे कृपाशीर्वाद सदैव ऊर्जा आणि शक्ती देत राहो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना केली, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी राज्यमंत्री श्री. सिद्धराम म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष श्री. प्रथमेश म्हेत्रे, माजी लोकसभा संपर्क प्रमुख श्री. महेश (नाना) साठे, माजी जिल्हाप्रमुख श्री. अमोल शिंदे, श्री. मनीष काळजे, माजी महिला जिल्हाप्रमुख सौ. रवीणाताई राठोड, माजी जिल्हाप्रमुख श्री. अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अनंत तानवडे आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button