
कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच बहुमताचे सरकार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पक्षसंघटनेसाठी गेल्या तीन वर्षांत कार्यकर्त्यांनी जे रक्ताचे पाणी केले, त्यामुळेच राज्याला हे ऐतिहासिक बहुमत मिळाले आहे. कार्यकर्त्यांच्या अहोरात्र आणि निष्ठावान मेहनतीमुळेच आज महाराष्ट्रात महायुतीचे सर्वात भक्कम सरकार सत्तेत आले आहे. या सत्तेचा वापर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी आपले सरकार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरी कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुण म्हणून ते मार्गदर्शन करत होते. या महत्त्वपूर्ण मेळाव्याला व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, विक्रांत पाटील, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, ऐश्वर्या जठार, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, वैभव खेडेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, राजू भाटलेकर, प्रमोद अधटराव, नीलेश सुर्वे, अभी गुरव, रुपेश कदम, संतोष गांगण, विनोद मस्के, स्वप्ना यादव, विनोद भुरण हे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



