१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू


*​रत्नागिरी, : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थी व पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळाने विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन (काउन्सिलिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.
​परीक्षांचे वेळापत्रक
​इयत्ता १२ वी (HSC) परीक्षा: १६ जून ते ८ जुलै २०२६
​इयत्ता १० वी (SSC) परीक्षा: १६ जून ते ३० जून २०२६
​समुपदेशन सेवा (८ जूनपासून सुरू)
​विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये किंवा इतर मानसिक अडचणी येऊ नयेत यासाठी ८ जूनपासून परीक्षा संपेपर्यंत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. खालील समुपदेशकांशी पालक व विद्यार्थी संपर्क साधू शकतात:
संदिप दत्ताराम शिर्के : ९५५२०६४६४०
भाग्यविधाता भास्कर वारंग : ९४२३२१३२४०
​शंका निरसनासाठी मंडळाचे अधिकारी व संपर्क क्रमांक
​विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे:
अधिकारी / कर्मचारी यांचे नावपद / विभागमोबाईल क्रमांक
पुनिता गुरव विभागीय सचिव ९०११२६२८४०
प्रेरणा शिंदे विभागीय सहाय्यक सचिव ९६७३०८००७७
अनिल पवार पर्यवेक्षक लिपिक (इ. १२ वी)९६७३MT१२६७ (९६७३१२१२६७)
राजेंद्र यादगिरे पर्यवेक्षक लिपिक (इ. १० वी)९४२०५१८२१३
गजानन जाधव लेखा व भांडार शाखा८०८७७४६१२२
विशेष हेल्पलाईन क्रमांक:
विद्यार्थी आणि पालकांसाठी ०२३५२ २३१२५० हा मुख्य हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध असून, यावर सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत संपर्क साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button