स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात प्रादेशिक स्तरावर रत्नागिरी प्रथम


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत प्रादेशिक स्तरावर रत्नागिरी विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रत्नागिरी नवीन बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकाविला असून, माखजन बसस्थानकाने द्वितीय क्रमांक मिळिवला आहे. विजेत्या बसस्थानकांचा मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात गौरव करण्यात आला.
मुंबईसह विभागांतील विविध निरीक्षण पथकांनी रत्नागिरीसह राज्यातील बसस्थानकांचे स्वच्छता, देखभाल, प्रवासी सुविधा आणि परिसर व्यवस्थापन यांसारख्या निकषांवर मूल्यमापन केले. या तिन्ही सर्वेक्षणांमध्ये रत्नागिरी नवीन बसस्थानकाने उत्कृष्ट कामगिरी करत ’अ’ मानांकन प्राप्त केले. अंतिम गुणांकनानंतर एसब.टी. महामंडळाच्या मुंबई प्रदेश नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या निकालात रत्नागिरी विभागातील रत्नागिरी नवीन बसस्थानकाने प्रतिष्ठेच्या ’अ’ गटात प्रथम क्रमांक पटकाविला, तर माखजन बसस्थानकाने सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक बसस्थानक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसब.टी. महामंडळाने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील बसस्थानकांमध्ये हे अभियान वर्षभर राबवले होते. या अंतर्गत विविध समित्यांकडून द्वितीय क्रमांक मिळविला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button