शाळा स्वच्छतेसाठी नगरसेविका वर्षा ढेकणे यांचा पुढाकारप्रभाग क्रमांक १५ मधील शाळा क्रमांक ३ मध्ये स्वच्छता मोहीम

प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत असलेल्या शाळा क्रमांक ३ मध्ये सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस सुरू होत असल्याने नगरसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांनी विशेष पुढाकार घेत शाळा परिसराची स्वच्छता करून घेतली
विद्यार्थ्यांना स्वच्छ सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे तसेच शाळेत वावरताना त्यांना सकारात्मक अनुभव मिळावा या उद्देशाने शाळेच्या आवारातील कचरा झाडांची छाटणी आणि परिसराची साफसफाई करण्यात आली यावेळी नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता कामात हातभार लावत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की शाळा ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र आहे मुलांना स्वच्छ आणि सुंदर वातावरण मिळाले तर त्यांचा अभ्यासात अधिक उत्साह वाढतो त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापूर्वी परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे

या उपक्रमामुळे पालक शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका वर्षा ढेकणे यांना धन्यवाद दिले

स्वच्छ आणि सुंदर शाळा परिसरामुळे विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button