लांजा शहरातील कोत्रेवाडी येथील काजू फॅक्टरीतील ९० हजारांचा काजू लंपास


लांजा शहरातील कोत्रेवाडी येथील काजू प्रक्रिया युनिटमधून तब्बल ९० हजार रुपये किंमतीचा काजू माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक सुहास सुरेश झिमण (वय ४५, रा.मालती अपार्टमेंट, माऊली नगर, लांजा, ता.लांजा) हे कोत्रेवाडी येथे झिमण्स कॅश्यू पॉईंट नावाचे काजू प्रोसेसिंग युनिट चालवतात. २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २९ मे रोजी सकाळी ९.२० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या युनिटच्या शेडमध्ये ठेवलेला काजूचा माल चोरून नेला.
चोरी झालेल्या मालामध्ये समीर पंडित यांचा ४२ हजार रुपये किंमतीचा अख्खा काजू तसेच १० किलोच्या ३७ बॅग (३७० किलो) यांचा समावेश आहे. यामध्ये १७किलो पाकळी व ३२ किलो तुकडा काजू होता. तसेच सुहास झिमण यांचा वैयक्तिक ४८ हजार रुपये किंमतीचा काजू माल, १० किलोच्या ४८ बॅग (४८० किलो) असा एकूण ९० हजार रुपये किंमतीचा काजू माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सुहास झिमण यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अन्वये (पूर्वीचे भादंवि कलम ३८०) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button