
उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सूचना
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली म. औ. वि. म. संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
राज्यातील औद्योगिक प्रकल्पांना गती देणे, नवीन गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करणे यावर मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यावर अधिक कार्य करण्याच्या सूचना दिल्या.




