
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर दारुअड्डे बंद करण्याचे आदेश
पिंपरी चिंचवड येथे विषारी गावठी दारू पिऊन झालेल्या मृत्यूच्या धक्कादायक घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेतून धडा घेत रत्नागिरी पोलीस दल पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकार्यांमार्फत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या भागात चालणार्या बेकायदेशीर दारू धंद्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com




