रत्नागिरी-चिपळूणमध्ये स्वयंचलित वाहन चाचणी केंद्राना वेग वाहनचालक आणि परिवहन क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी

अत्याधुनिक स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रे आता रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्यक्षात आकार घेऊ लागली आहेत. रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तसेच चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांच्या कामाला वेग आला असून, या प्रकल्पाचे कामकाज सुरू झाले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या पुढाकारातून राज्यभरात ३८ ठिकाणी स्वयंचलित वाहनचालन चाचणी पथ आणि ६ ठिकाणी स्वयंचलित वाहन परीक्षण केंद्रे उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी आणि चिपळूण येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या केंद्रांमुळे वाहनांची योग्यता तपासणी आणि परीक्षण अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने होणार आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संरक्षक भिंत, नवीन विद्युत जोडणी, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचे अंदाजपत्रक प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह तयार करण्यात आले आहे. मोटार वाहन निरीक्षक राजश्री पाटील यांनी हे अंदाजपत्रक पुढील कार्यवाहीसाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे सादर केले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button