मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आज दोन तास ब्लॉक; बोरघाटात वाहतूक बंद


मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील बोरघाट परिसरात आज, १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रॉकफॉल प्रतिबंधक जाळीत अडकलेले दगड काढण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव या काळात दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक थांबवण्यात किंवा वळवण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सुमारे ४७ किलोमीटर अंतरावर हे काम केले जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरावरून दगड कोसळण्याची दुर्घटना टाळण्यासाठी हे काम तातडीने केले जात आहे. या ब्लॉकदरम्यान प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन ‘एमएसआरडीसी’ने केले आहे.
असा असेल वाहतूक बदल (दुपारी १२ ते २):

१. जड व अवजड वाहनांसाठी:
मुंबईकडे जाणारी वाहतूक: बोरघाट मार्गे मुंबईकडे जाणारी ५० किमीपासून पुढील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पुण्याकडे जाणारी वाहतूक: मुंबईकडून पुण्याकडे जाणारी ३० किमीपासून पुढील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाईल.

सर्व बसेस, प्रवासी वाहने तसेच जड-अवजड वाहने द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक ४५ येथे थांबविण्यात येतील.

२. हलकी वाहने, बसेस आणि प्रवासी वाहनांसाठी पर्यायी मार्ग:

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने: ही वाहतूक ५० किमीपासून कनेक्टिंग लिंकमार्गे (जुना मुंबई-पुणे हायवे) वळविण्यात येणार आहे.मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने: ही वाहतूक ३२ किमीपासून कनेक्टिंग लिंकमार्गे वळविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button