मिरजोळे ग्रामपंचायतीचा दणका: ‘अरिहंत प्राईम’मधील अनधिकृत होमस्टे बंद करण्याचे आदेश; रहिवाशांकडून आभार

रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील अरिहंत प्राईम रेल्वे स्टेशन बस स्टॉप कॉर्नर गृहनिर्माण संकुलात सुरू असलेल्या अनधिकृत व्यावसायिक होमस्टे सुविधेवर ग्रामपंचायतीने कारवाई केली आहे.

या संकुलातील इमारत ‘सी’, सदनिका क्र. १०४ मध्ये सुरू असलेली होमस्टे सुविधा तातडीने बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायत कार्यालयाने दिले आहेत.

नेमके प्रकरण
अरिहंत प्राईम सी‑१०४ या सदनिकेमध्ये चालू असलेल्या होमस्टे सुविधेला स्थानिक रहिवाशांचा ठाम विरोध होता रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता,निवासी मालमत्तेचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केल्यामुळे परिसरातील शांतता, सुव्यवस्था आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत अरिहंत प्राईमचे रहिवाश्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती.

ग्रामपंचायतीची भूमिका
ग्रामपंचायत दप्तरी सदनिका ‘निवासी’ मालमत्ता म्हणून नोंदवलेली असून, व्यावसायिक उपक्रम चालवण्यासाठी कोणताही परवाना किंवा ‘ना हरकत दाखला’ दिलेला नाही. नियमांचे उल्लंघन झाल्याने ग्रामपंचायतीने संबंधित मालकाला ही सुविधा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रहिवाशांकडून समाधान
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे अरिहंत प्राईममधील सर्व रहिवाशांनी स्वागत केले आहे. परिसरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेबद्दल रहिवाशांनी ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button