पावसाळ्यापूर्वी आरोग्य यंत्रणा अलर्ट, आरोग्य सभापती विलास चाळके यांनी दिले आदेश


आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम आणि सज्जा ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने आखलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खातरजमा जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी स्वतः करावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. ज्या आरोग्य केंद्राच्या इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची यादी आणि प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या कामांसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येपार असल्याचे सभापती चाळके यांनी सांगितले.
पावसाळ्यात पूरग्रस्त भागांमध्ये दुषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तत्काळ तपासणी करण्यासह नागरिकांना पर्यायी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा आणि लसींची उपलब्धता तपासून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button