भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा बहुमान



रत्नागिरी : कोकणच्या कृषी संशोधनासाठी अत्यंत अभिमानास्पद बाबम्हणजे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या वर्षासाठी देशातील बागायती उपवन पिकांमधील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ म्हणून गौरविण्यात आले आहे.

केरळमधील कासारगोड येथे आयोजित अखिल भारतीय समन्वित उपवन पिके संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा सभेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी हा सन्मान स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button