पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज


कोकणात मान्सूनच्या आगमनाची चाहल लागताच कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक तीव्र फैल्या आहेत. भूस्खलन, दगड कोसळणे आणि रेल्वे मार्गावरील संभाव्य धोके लक्षात घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ने महत्त्वाच्या विभागांवर रात्रगस्त सुरू केली असून संवेदनशील ठिकाणी २४ तास पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर दि. ३ जून २०२६ रोजी रत्नागिरी येथे केआरसीएलच्या सुरक्षा विभागातर्फे मान्सून गस्त’ या विषयावर विशेष सुरक्षा चर्चासत्र आणि गस्तीच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. रात्रगस्त पथकातील कर्मचा-यांवर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत रेल्वे मार्गावर पायी गस्त घालण्याची जबाबदारी असते. या गस्तीदरम्यान भूस्खलन, पाणी साचणे, दगड कोसळणे किंवा रेल्वे वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या कोणत्याही असामान्य घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. अशी कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित स्टेशन मास्तरला माहिती देण्यात येते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button