पाणीसाठा तळाला गेल्याने कोयनेची वीजनिर्मिती पूर्णपणे बंद


संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणच आज अभूतपूर्व संकटात सापडले आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा तळाला गेल्याने पश्चिमेकडील जलविद्युत वीजनिर्मिती पूर्णपणे बंद झाली आहे. तर पूर्वेकडील सिंचन व्यवस्थेवर कडक मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याधरणातील पाणी वाटपाच्या अनुषंगाने सोमवारी जलनिती ठरणार असल्याचे अधिक्षक अभियंता अभय काटकर यांनी सांगितले. मे अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार धरणात केवळ १०.९२ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. लवादाने निर्धारित केलेला पाणी कोटा २९ मे रोजी संपल्याने पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महानिर्मिती कंपनीकडून वीज प्रकल्प अखंडित सुरू ठेवण्यासाठी पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button