पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या यशस्वी वाटचाली निमित्त रत्नागिरीत महाआरती


रत्नागिरी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी वाटचालीला बुधवार, दि. 10 जून रोजी 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने आज श्री देव विश्वेश्वर मंदिर, राजिवडा येथे सकाळी 9 वाजता पूजा, अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, सुरक्षा आणि स्वाभिमानाची नवी उंची गाठली. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने गरीब कल्याण, डिजिटल भारत, स्वच्छ भारत आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजना राबवून भारताला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. तसेच आज भारत देशामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना मिळाला आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, नगरसेवक संदीप सुर्वे, नितीन जाधव, सुप्रिया रसाळ व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, युवा मोर्चा व महिला मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button