
दापोली शहरात विजेच्या झटक्याने जखमी वानराला वनविभागाच्या अधिकार्यांकडून जीवदान
दापोली शहरात विजेच्या झटक्याने जखमी वानराला वनविभागाच्या अधिकार्यांकडून जीवनदान
दापोली शहरातील कोकंबाआळी येथे एका मादी वानराला आपल्या चिमुकल्या पिल्लासह विजेचा जोरदार धक्का लागल्याची दुर्दैवी घटना घडली. विजेच्या धक्क्याने हे वानर मायलेक गंभीर जखमी अवस्थेत विद्युत खांबाजवळ वेदनेने विव्हळत पडले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि प्राणीमित्रांच्या प्रसंगावधनामुळे तसेच वन विभागाच्या अधिकार्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या दोन्ही जिवांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
www.konkantoday.com




